Nigeria Boat Accident : नायजेरियात बोट अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून, काहींचा शोध सुरू आहे. नायजेरियात रविवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील नायजर प्रांतातील मोकवा येथे बोटीतून प्रवास करताना बुडून मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि मुले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या भागात गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा अपघात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नायजेरियाचा हा भाग अतिशय मागासलेला आहे.
100 हून अधिक प्रवासी बोटीवर होते
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नायजेरियाच्या नायजर राज्याच्या गव्हर्नरचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, अपघात झालेल्या बोटीवर 100 हून अधिक लोक होते. बोटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मोकवा नावाच्या ठिकाणी हा अपघात झाल्याचे प्रवक्त्याने सांगितले. इब्राहिम पुढे म्हणाले की, बोट दुर्घटनेत प्राण गमावलेले आणि बेपत्ता झालेले लोक धरण ओलांडून आपापल्या शेतात जात होते. अशा परिस्थितीत बहुतांश लोक शेतकरी असल्याचे मानले जाते.
30 जणांची सुटका करण्यात यश
राज्यपालांचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, बोट दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले होती. अपघातातील सुमारे 30 जणांना वाचविण्यात यश आले आहे. नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.
जुलै महिन्यात बोट दुर्घटनेत 100 जणांचा मृत्यू झाला होता
नायजेरियाच्या या भागात यापूर्वीही असे अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात बोट बुडाल्याने 100 जणांचा मृत्यू झाला होता. नायजर राज्यातील दुर्गम भागात हा अपघात झाला. या अपघाताचे कारण बोटीचे वजन जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अलिकडच्या काळात नायजेरियात घडलेला हा अशा प्रकारचा सर्वात मोठा अपघात होता. या अपघातानंतर नायजेरियाच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या आफ्रिकन देशात सर्वाधिक बोटींचे अपघात गर्दीमुळे आणि बोटींची देखभाल न केल्यामुळे होतात. नायजेरियाच्या अंतर्गत भागात योग्य वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे, लोक नद्या पार करण्यासाठी बोटींचा आसरा घेतात. मात्र, या बोटींच्या जीर्ण अवस्थेमुळे अनेकजण अपघाताचे बळी ठरतात. याशिवाय, काही वेळा बोट मालक पैशांच्या लालसेपोटी गरजेपेक्षा जास्त प्रवासी बसवतात. त्यामुळे हेदेखील अपघाताचे एक कारण ठरतं.
महत्त्वाच्या बातम्या :