Russia Ukraine Conflict : यूक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर NATO च्या प्रमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत नाटो प्रमुख जेन्स स्टॉलटेनबर्ग यांचे वक्तव्य समोर आले आहे.

Continues below advertisement

Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या हल्ल्याला संपूर्ण युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवरील हल्ला म्हटले आहे. जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, 'रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा युक्रेनवरील हल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हा युक्रेनमधील निरपराध लोकांवर केलेला भयंकर हल्ला आहे. हा संपूर्ण युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवरही हल्ला आहे.'

Continues below advertisement

नाटो प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले, 'नाटोचे दल जमिनीवर, समुद्रात आणि हवेत तैनात केले जातात. क्रेमलिनची उद्दिष्टे केवळ युक्रेनपुरती मर्यादित नाहीत. युक्रेनचे सरकार बदलण्याचे मॉस्कोचे उद्दिष्ट आहे. मी युक्रेनच्या सशस्त्र दलांबद्दल माझा आदर व्यक्त करतो, ज्यांनी खरोखरच प्रचंड आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याविरुद्ध उभे राहून आपले शौर्य आणि धैर्य सिद्ध केले आहे.'

पाश्चात्य देशांची आपत्कालीन बैठक
दरम्यान, पाश्चात्य देशांच्या नेत्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी हल्ले थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली आहे कारण त्यांना भीती आहे की रशिया लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकेल. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते.

जो बायडेन आणि व्लादिमिर झेलेन्स्की यांच्यातील संभाषण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की युक्रेनच्या संकटादरम्यान निर्बंध आणि संरक्षण मदतीबद्दल संभाषण झाले. व्हाईट हाऊसने पुष्टी केली आहे की ही चर्चा सुमारे 30 मिनिटे चालली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगतले की, ठोस संरक्षण मदतीबाबत बायडेन यांच्याशी चर्चा झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola