NASA UFO Alien Report: अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गुरुवारी (14 सप्टेंबर) यूएफओवर आधारित आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सुमारे एक वर्ष UFO (अन-आयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट) चा अभ्यास केल्यानंतर नासानं हा अहवाल जारी केला आहे. नासाच्या या 33 पानांच्या अहवालात यूएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठं रहस्य असल्याचं वर्णन करण्यात आलं आहे. हा अहवाल प्रसिद्ध करताना अमेरिकन स्पेस एजन्सीचे व्यवस्थापक बिल नेल्सन म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की, पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी (एलियन) आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून एलियन आहेत की नाही? त्यांचं अस्तित्व खरंच आहे का? ते कुठे राहतात? त्यांना कोणी पाहिलंय का? यांसारखे अनेक प्रश्न चर्चेत होते. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं अमेरिकन स्पेस एजन्सी नासानं दिली आहेत. नासानं जगातील सर्वात मोठा खुलासा केला आहे. त्यांना UFO किंवा UAP म्हणजे काय हे माहीत नाही. पण इतर जगाशी त्यांचा काहीही संबंध नाही, हे आम्हाला नक्कीच माहीत आहे. तरीही आमच्याकडे असलेले पुरावे असं सुचवत नाहीत की UAP चे दुसऱ्या जगाशी काही संबंध आहेत. आम्ही त्यांचा शोध घेऊ. तसेच, अगदी वैज्ञानिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास करू, असं नासाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 




UAPs पृथ्वीभोवती किंवा त्याच्या वातावरणात तयार होऊ शकतात, अशी पर्यावरणीय परिस्थिती आहे का? याचा नासा अभ्यास करणार आहे. असं देखील असू शकतं की, एलियन किंवा यूएफओ आपल्या एयर ट्रॅफिक मॅनेजमेंटमुळे अवकाशात होणाऱ्या एखाद्या बदलाचा परिणाम असतील. 


नासानं आश्वासन दिलं आहे की, ते या एलियन्स किंवा यूएफओचा वैज्ञानिक शोध घेतील, तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेणार, तसेच, एलियन किंवा त्यांची वाहनं दिसणं म्हणजेच, UFO. यूएफओ नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. अमेरिकेनं यूएफओला वेगवेगळ्या नावांनी संबोधण्यास सुरुवात केली आहे. याला Unidentified Anomalous Phenomena (UAP - Unidentified Anomalous Phenomena) म्हणतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षी नासानं एक टीम तयार केली होती.


योग्य फोटो किंवा व्हिडीओ नसल्यामुळे समस्या 


उच्च दर्जाचे फोटो किंवा व्हिडीओ नसल्यामुळे, हे UFO समजणं अधिक कठीण होतं. अवकाशात दिसणारी ती गोष्ट विमान आहे की, कुठलीतरी नैसर्गिक घटना आहे, हे अनेक वेळा स्पष्ट होत नाही. यानंतर नासानं 16 जणांची टीम तयार केली. या टीममध्ये वैज्ञानिक, एयरोनॉटिक आणि डेटा एनालिटिक तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांचा मुख्य उद्देश UAPs किंवा UFOs ची लॉजिकल आणि सायंटिफिक व्याख्या किंवा कारण देणं हा होता. नासाचे शास्त्रज्ञ थॉमस झुरबुचेन यांनी सांगितले होते की, आम्ही पृथ्वीवरून अंतराळात अनेक प्रकारच्या गोष्टी पाहिल्या आहेत. जे जाणून घेणं महत्वाचे आहे. आमच्या टीमनं तेच केलं.


गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खगोलभौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड स्पर्गेल यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. त्यांनी अशा घटनांशी संबंधित डेटाचा सतत 9 महिने तपास केला. हे लोक UFOs आणि UAP च्या सापडलेल्या व्हिडीओंचा अभ्यास करत होते. फोटोही तपासत होते.