नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी यावेळी मोदींना एक रंजक गोष्ट सांगितली. आपल्या नातवाचं नामकरण तुमच्या नावावरुन केलं, असं विदोदोंनी मोदींना सांगितलं.
विदोदो यांचे ज्येष्ठ पुत्र गिब्रान राकाबुमिंग यांना मार्च 2016 मध्ये मुलगा झाला. नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन त्याचं नामकरण 'जान एथेस श्रीनरेंद्र' असं करण्यात आलं.
नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच इंडोनेशिया दौरा आहे. इंडोनेशियाची प्रसिद्ध गायिका फ्रिडा लुसियाना हिने मोदींचं स्पेशल परफॉर्मन्स देऊन स्वागत केलं. 1954 मधील जागृती चित्रपटातील 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल' हे गाणं गाऊन तिने मोदींचं स्वागत केलं.
पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिणपूर्व आशियाई देशांसोबत नातेसंबंध दृढ करणे, हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
मोदीजी, माझ्या नातवाचं नावही श्रीनरेंद्र : इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2018 11:35 AM (IST)
आपल्या नातवाचं नामकरण तुमच्या नावावरुन केलं, असं इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -