काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला करत एका मिनीबसवर निशाणा साधला. या हल्ल्यात तब्बल 14 नेपाळी सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. पोलीस जखमींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ता सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आत्मघातकी हल्लेखोरांनी विदेशी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या बसला निशाणा बनवलं. सध्या आम्ही जखमी नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत."

 

पण एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्या ठार झालेले 14 लोकं हे नेपाळी नागरिक होते. जे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. तर जखमींमध्ये चार अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे.

 

हा हल्ल्याची जबाबदारी तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने घेतली आहे. तालिबान्यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि अफगाणी सुरक्षा जवानांवर देशभरात हल्ले वाढवले आहेत.