लाहोर: पाकिस्तानी मॉडेल कंदील बलौचच्या हत्याप्रकरणानं आता एक नवं वळण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंदील सोबतच्या सेल्फीनं चर्चेत आलेल्या मौलवीनंच कंदीलच्या हत्येसाठी आपल्या मुलाला भडकवल्याचा आरोप कंदील बलौचच्या आईनं केला आहे. सोशल मीडियावर कंदील बलौचसोबतचा वादग्रस्त व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच मौलवी दिसले होते. त्यामुळे कंदीलच्या खुनामध्ये मौलवींचा काही सहभाग आहे का? या दृष्टीनं तपास सुरु असतानाच कंदीलच्या आईनं हा धक्कादायक आरोप केला आहे. कंदील सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मौलवी मुफ्ती कवी यांना रुएत ए हिलाल कमेटीवरुन हटविण्यात आलं होतं. जीओ न्यूजशी बातचीत करताना कंदीलच्या आईनं आरोप केला आहे की, मुफ्ती कवी, कंदीलचा पहिला पती आशिक हुसैन आणि शाहीद हे देखील आपल्या मुलीच्या हत्येत सहभागी आहेत. संबंधित बातम्या