न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका फार्मसीमध्ये पुरुषांवर टॅक्स लादला जात आहे. लिंगाधारीत किंमत न्यूयॉर्कमधील थॉम्पसन केमिस्ट या दुकानात सुरु करण्यात आली आहे. यात पुरुषांना 7 टक्के जास्तीचा पुरुष टॅक्स द्यावा लागणार आहे.
अमेरिकेत महिलांच्या सौदर्यप्रसाधनावर आकारल्या जाणाऱ्या पिंक टॅक्स आकारली जातो. याच कल्पनेतून पुरुषांवरही तशाच प्रकारचा टॅक्स आकारण्याचा निर्णय या दुकानाने घेतला आहे. तशा प्रकारची पत्रकं दुकानाच्या बाहेर लावण्यात आली आहेत.
"महिलांवरच जादा टॅक्स आकारणे चुकीचं आहे, त्यामुळे पुरुषांनाही औषधांसाठी 7 टक्के जास्त टॅक्स आकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे," असं दुकानाच्या मालक ज्यूली अलोनी यांनी सांगितलं आहे.