माले (एएफपी) : मालदीवमधील राजकीय संकट अधिकच गहिरं झालं आहे. कारण, देशात गेल्या 15 दिवसांसाठी लागू केलेल्या आणीबाणीमध्येच मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल गयूम यांना अटक करण्यात आली आहे. गयूम हे विद्यमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सावत्र भाऊ आहेत.
मालदीवचे अध्यक्ष अब्दुला यामीन यांनी गेल्या सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी न करता, 15 दिवसांची आणीबाणी जाहीर केली. त्यामुळे मालदीवमध्ये सर्व नागरिकांचे मुलभूत अधिकार रद्द करण्यात आले आहेत.
मालदीवच्या सुप्रीम कोर्टाने काही राजकीय कैदी आणि अटक केलेल्या खासदारांना सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, राष्ट्रपती यमीन यांनी हे आदेश पाळण्यास नकार दिला. त्यामुळे मालदीवमधील जनता यमीन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे माजी राष्ट्रपती आणि विद्यमान राष्ट्रपतींचे सावत्र भाऊ अब्दुल गयूम यांना अटक करण्यात आली आहे. गयूम यांची मुलगी युम्ना मौमूनने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.
मालदीवमध्ये लोकशाही स्थापन होण्यापूर्वी तब्बल 30 वर्षे देशाचे राष्ट्रपती होते. त्यांनी विद्यमान राष्ट्रपती अब्दुल यमीन यांना हटवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती.
दरम्यान, मालदीवमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पूर्ववत होत नाही. तोपर्यंत मालदीवमधल्या भारतीयांना खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मालदीवमध्ये राजकीय संकट गहिरं, माजी राष्ट्रपतींना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2018 10:13 AM (IST)
मालदीवमधील राजकीय संकट अधिकच गहिरं झालं आहे. कारण, मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल गयूम यांना अटक करण्यात आली आहे. गयूम हे विद्यमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सावत्र भाऊ आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -