न्यूयॉर्क : शहर, देश आणि जगभरातील विविध कार्यक्रमांना मदत करण्यासाठी एक संस्था स्थापन केली असल्याचं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी म्हटलं आहे.


पुन्हा जुन्या ट्विटर हँडलवर आलो आहे. मिशेल आणि मी काही दिवस सुट्टीवर आहोत. त्यानंतर पुन्हा कामात सक्रिय होऊ, असं ट्वीट ओबामांनी केलं आहे.

https://twitter.com/BarackObama/status/822550300942856193

दरम्यान पुढे काय करावं, त्यासाठी आपला सल्ला द्यावा, अशी विनंतीही ओबामांनी चाहत्यांना केली आहे.

https://twitter.com/BarackObama/status/822550300942856193

व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ओबामा परिवार आता नव्या घरात राहणार आहे. 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.

संबंधित बातम्या :

ओबामा व्हाईट हाऊसनंतर 'या' आलिशान घरात राहणार


थँक्यू मोदी, बराक ओबामांचा पंतप्रधान मोदींना कॉल


आता ओबामा नव्हे, मोदीच जगातील सोशल मीडियाचे 'बॉस'!