अल जवाहिरी हा याआधी पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. तालिबानचा गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिरादुद्दीन हक्कानीने जवाहिरीला सर्वात सुरक्षित स्थळी लपवले होते. जवाहिरीच्या मागावर असलेल्या अमेरिकेला त्याचा ठावठिकाणा त्याच्या एका सवयीमुळे लागली असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने दिली.
कोणती चूक महागात?
अल जवाहिरी हा दररोज सकाळी बाल्कनी येथून काही तासांसाठी थांबत असे. त्याच्या या सवयीमुळे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा संशय बळावला. त्यानंतर हा जवाहिरी असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकन गुप्तचर संघटनेने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर नियोजन करत अमेरिकेने रिपर ड्रोनने हेलफायर क्षेपणास्त्र डागत जवाहिरीचा खात्मा केला. या हल्ल्यात हक्कानीचा मुलगा आणि जावईदेखील ठार झाले असल्याची चर्चा सुरू आहे. जवाहिरी हा 71 वर्षांचा होता. लादेनच्या खात्म्यानंतर त्याच्याकडे अल कायदाची सूत्रे होती.
जवाहिरी हा पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये आला असल्याची माहिती सहा महिन्यांपूर्वी अमेरिकन यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर त्याच्याबाबत कसून चौकशी सुरू करण्यात आली. या खास मोहिमेसाठी व्हाइट हाऊसमध्येच नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले होते. अनेक महत्त्वाचे निर्णय येथून घेतले गेले. अखेर यंत्रंणांना त्याचा सुगावा लागला आणि मोहीम फत्ते केली. जवाहिरी लपलेल्या परिसरात कोणताही ग्राउंड सपर्ट नसल्याने अमेरिकन यंत्रणांना जवाहिरी मारला गेला असल्याची खात्री करण्यासाठी दोन दिवस गेले. ही खात्री पटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: