इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गुरुवारी चहा देण्यासाठी पत्नीला उशीर झाल्याने पतीने चक्क कुऱ्हाडीने तिची हत्या केली आहे. पाकिस्तानमधील नाग्जी कोल्ही ने आपली पत्नी केस्सो कोल्ही (वय २३) ची चहा देण्यास उशीर झाला म्हणून निर्घृण हत्या केली.

 

दरम्यान, तांडो बागो शहरातील थुही सेघारी गांवच्या कोल्हीला पोलिसांनी अटक केली आहे.  कोल्हीने दिलेल्या कबुली जबाबात चहा देण्यास उशीर झाल्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.