बीजिंग : वाहतूक कोंडी ही आपल्यासाठी नवी गोष्ट नाही. खराब रस्ते, टोलनाके, अपघात, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ट्रॅफिक जॅममध्ये अडकतोच. पण सोशल मीडियावर चीनमधील विराट वाहतूक कोंडीचा व्हिडीओ व्हायरल होत असून, ते दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.



चीनची राजधानी बीजिंगमध्ये तब्बल 40 पदरी महामार्गावर अभूतपर्व वाहतूक कोंडी झाली. महत्त्वाचं म्हणजे टोलनाक्यामुळे हे ट्रॅफिक जॅम झालं.



नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वीकेन्ड प्लॅन करुन गेलेल्या चीनमधील हजारो नागरिकांना या वाहतूक कोंडीमध्येच न्यू ईयर साजरा करावा लागला. या कोंडीचं ड्रोनने चित्रिकरणही करण्यात आलं आणि तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अनेक अतिउत्साही चालकांनी गाड्या रॉन्ग साईडने काढल्याने या वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडली.


 

पाहा व्हिडीओ