Japan Hakuto-R Private Moon Mission: जपानी (Japan) स्टार्ट अप आय स्पेसची मून लँडर मोहिम अयशस्वी ठरली आहे. मून लँडरचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची कंपनीने माहिती दिली आहे. चंद्रावर उतरणारी पहिली खासगी कंपनी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. जपानच्या लँडरचे नाव हकोते-आर मिशन (Hakuto-R Mission) होते. यशस्वी न होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र लँडर रोव्हर वेगात उतरण्याच्या प्रयत्नात असताना अपघात झाला. अंतिम टप्प्यात लँडरचा समतोल बिघडला असण्याची शक्यता आहे.
आयस्पेसच्या (ispace) अधिकाऱ्यांनी एका लाईव्ह स्ट्रिममध्ये सांगितले की, लँडरशी आमचा संपर्क तुटला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. जपानी कंपनीचा हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फ्लोरिडामधील केप कॅनाव्हरल येथून प्रक्षेपित करण्यात आला होता.
स्पेसएक्स फाल्कन-9 रॉकेटच्या मदतीने केले लॉन्च
स्पेसएक्स फाल्कन-9 रॉकेटमधून (SpaceX Falcon-9 rocket) प्रक्षेपित झाल्यानंतर एक महिन्यापूर्वी स्पेस जेट चंद्राच्या कक्षेत पोहोचले. हकोतो-आरने मंगळवारी चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी 100 किलोमीटर उंचीवरून ताशी 6,000 किलोमीटर वेगाने झेपावले. लँडिग दरम्यान काही अडचणी आल्यामुळे संपर्त तुटला. लँडरची रचना JAXA, जपानी टॉयमेकर टॉमी आणि सोनी ग्रुप, तसेच संयुक्त अरब अमिरातीच्या रशीद रोव्हरने विकसित केली होती.
पुढील वर्षी करणार लॉन्च
हकोतो-आर मिशन (Hakuto-R Mission) 100 किलोमीटरच्या उंचीवरून ते ताशी 6,000 किलोमीटर वेगाने उड्डाण करत होते. जपानपूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच चंद्रावर लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. भारताने देखील प्रयत्न केला होत. मात्र भारताला अपयश आले होते. भारताच्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विक्रम लँडरचा (Chandrayaan 2 Vikram Lander) संपर्क तुटला. जपानने या मोहिमेशी संबंधित दुसरे यान पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Lunar Mission : आता चंद्रावर उभारली जाणार अणुभट्टी... उर्जेची गरज भागणार; रोल्स रॉयसचा प्रकल्प