Operation Sindoor: भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.(Operation Sindoor) मध्यरात्री 1.28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरु होऊन 1.51 वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाले. (Air Strike On Pakistan) दरम्यान, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव वाढला होता. भारताकडून कधीही पाकिस्तानवर हल्ला होईल या भीतीने पाकिस्तान बिथरला असतानाच भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्याने जगभरातून या स्ट्राईकवर प्रतिक्रीया येत आहेत. चीन, अमेरिकेने भारताच्या लष्करी कारवाईवर निषेध नोंदवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभारलेल्या जपानने (Japan) आता ऑपरेशन सिंदूरनंतर चिंता व्यक्त केलीय.
भारताच्या एअरस्ट्राईकवर जपानची प्रतिक्रीया काय?
"आम्हाला खूप काळजी वाटते की या घटनेमुळे प्रतिशोध भडकू शकतो आणि लष्करी संघर्ष वाढू शकतो. दक्षिण आशियात शांतता सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांना संयम राखण्याचे आणि संवादाद्वारे परिस्थिती स्थिर करण्याचे आवाहन करतो." जपानचे मुख्य मंत्रिमंडळ सचिव योशिमासा हयाशी यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केलं आहे.
आंतरराष्ट्रीय पटलावर दोन्ही देशांमध्ये समन्वय साधला जावा. संघर्ष टाळावा यासाठी आग्रह धरला जात असताना भारताच्या या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रीया येत आहेत. भारताने केलेली लष्करी कारवाई दूर्देवी असल्याचं म्हणत चीन भडकल्याचे दिसले.तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांच्यासह जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जपाननेही सुरुवातीच्या दहशतवादी कृत्याचा निषेध केला आहे आणि परिस्थिती कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
1. बहावलपूरजैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयआंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदकेलष्कर-ए-तैयबाचे मुख्यालयसीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाईलश्कर-ए-तोयबाचा अड्डासीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूरदशतवाद्यांचा अड्डा ताबारेषेपासून 35 कि.मी. दूरहल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलालजैश-ए-मोहम्मदचं हवाई तळसीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटलीनियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनालादहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजालजैश-ए-मोहम्मद चा अड्डा सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूनाहिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्रसीमेपासून 15 कि.मी.दूर
हेही वाचा: