Japan PM Speech Blast: जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी हा भीषण बॉम्बस्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. फुमयो किशिदा य बॉम्ब हल्ल्यात थोडक्यात बचावले. समोर आलेल्या माहितीनुसार जपानच्या पंतप्रधानांवर स्मोक बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जपानच्या पंतप्रधानांवर वाकायामा या शहरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या बॉम्बहल्ल्याचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. बॉम्बस्फट झाल्यांनतर मोठी खळबळ उडाली. स्फोटानंतर नागरिक सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावत होते.
घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा थोडक्यात बचावले आहे. जपानचे पंतप्रधान सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका उमेदवारासोबत भाषण देणार होते. पण त्या अगोदर ही भीषण घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ समोर येत आहे. दुसऱ्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये घटनास्थळी भाषणादरम्यानचे नागरिक फोटो आणि व्हिडिओ बनवत होते. दरम्यान एक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गेल्या वर्षी हत्या
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जून महिन्यात हल्ला करण्यात आली होती. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिंजो आबे भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. शिंजो आबे यांना छातीत गोळी लागली होती.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भारत दौऱ्यावर
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दौऱ्यावेळी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चांगला संबंध पाहायला मिळाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांनी मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही घेतला आस्वाद; पाहा व्हिडीओ