इस्तंबुलमध्ये 2 भारतीयांसह 39 जणांचे प्राण घेणारा अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2017 08:03 AM (IST)
इस्तंबुल : नववर्षाचं स्वागत सुरु असताना 39 निरपराध नागरिकांचे प्राण घेणाऱ्या इस्तानबुलमधील क्रुरकर्म्याला अखेर पकडण्यात आलं आहे. तुर्कीतल्या प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. इस्तंबुलच्या इसेन्युअर्ट या जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर सीरियामध्ये तुर्की सैन्यानं केलेल्या कारवाईचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं आयसिसनं म्हटलं आहे.