Israel Hamas War  Viral Video :  देव तारी त्याला कोण मारी...ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. गाझामध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर ३७ दिवसांनी ढिगाऱ्याखाली एक मूल जिवंत सापडले आहे. या मुलाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भावूक होईल.


'गल्फ न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलेल्या या मुलाचा जन्म इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी झाला होता. संघर्षाच्या सुरूवातीस, इस्रायलने गाझा पट्टीवर प्रचंड बॉम्बफेक सुरू केली, या हल्ल्यात असंख्य घरे नष्ट झाली. सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते. गाझा येथील निवासी भाग चिखलात बदलला. या उद्धवस्त घरांमध्ये एक निष्पाप बालकही होता.


इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात त्या निष्पाप मुलाचे घर उद्ध्वस्त झाले असले तरी बालक श्वास घेत होते. ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानंतर 37 दिवस निष्पाप बालक जिवंत राहिले. एक महिन्यानंतर मूल सुखरूपपणे वाचले. बचाव कार्यादरम्यान मदत कर्मचाऱ्यांनी या मुलाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मुलाला जिवंत पाहून मदत कर्मचार्‍यांचे चेहरेही उजळले.







मुलाला जिवंत पाहून मदत कर्मचार्‍यांना आनंद झाला


सिव्हिल डिफेन्सचे सदस्य आणि फोटोग्राफर नोह अल शाघनोबी यांनी या निष्पाप मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर तुटलेल्या घरातून मुलाला कसे बाहेर काढण्यात आले, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यावर उपस्थित सर्वांनी आनंदाने जल्लोष केला. सर्वांनी देवाचे आभार मानले. प्रत्येकजण आपल्या मांडीत असलेल्या निष्पाप मुलावर प्रेम करताना दिसत आहे. ते मूलही आपल्या निरागस डोळ्यांनी नव जगं, नवीन चेहरे पाहत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी ढिगाऱ्याखालून वाचलेल्या या निष्पाप बालकाच्या कुटुंबाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.



हमासकडून 13 इस्रायली ओलिसांची सुटका 


24 नोव्हेंबर रोजी हमासने (Hamas) ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या एका गटाची सुटका केली. त्याशिवाय थायलंडच्या 12 नागरिकांचीदेखील सुटका केली. हमासने ओलिसांना इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या (ICRC) ताब्यात दिले. सुटका केलेले सर्वजण महिला आणि मुले आहेत. ओलिसांची सुटका झाल्यानंतर इस्रायलने 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.  मुक्त झालेल्यांमध्ये 24 महिला आणि 15 पुरुषांचा समावेश आहे.