26 वर्षीय मोहम्मद शफी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावचा रहिवासी आहे. भारतातील तरुणांनी आयसिसमध्ये भरती करण्याचं महत्त्वाचं काम शफीकडे होतं. त्याने सुमारे 30 तरुणांना आयसिसमध्ये भरती केल्याचं समजतं.
मोहम्मद शफी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या संपर्कात होता. फेसबुक ग्रुप आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याने 600 ते 700 तरुणांशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर तरुणांची भरती करण्यासाठी त्याने ऑनलाईन ट्रान्सफर आणि हवालामार्फत फंड जमा केला.
मोहम्मद शफी अरमारच्या मृत्यूमुळे आता भारतात आयसिस नेतृत्त्वहीन झालं असावं, असं सरकारी सुत्रांचं म्हणणं आहे.