Kabul Airport Blast : अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांमुळे किमान 72 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना)  या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. या दहशतवाद्यांना आम्ही माफी करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. 


ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना)  या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी रात्री काबुल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 60 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून 150 हून जास्त नागरिक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यतिरिक्त 11 अमेरिकन सैनिकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 


 






अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, "आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकन नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची मोहीम सुरुच राहणार आहे."


हल्ल्याची गुप्त माहिती होती
ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने काबुल विमानतळावर आयएसआयएस या दहशतवादी गटाकडून हल्ला करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी दिली होती. ब्रिटनचे संरक्षण सचिव जेम्स हिप्पी म्हणाले होते की, या हल्ल्याचे तपशील देता येणार नाहीत पण हा हल्ला होणार आहे ही खात्रीशीर माहिती आहे. गुप्तचर इनपुटमध्ये असे म्हटलं होतं की हा हल्ला आयएसआयएसकडून केला जाऊ शकतो. यापूर्वी तालिबानने पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून हजारो लोकांनी अफगाणिस्तान सोडले आहे. 


तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून हजारो नागरिक आपल्या जीवाच्या भीतीने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व लोकांनी काबुल विमानतळावर एकच गर्दी केली असून या विमानतळाचा ताबा आता अमेरिकन सैन्याने घेतला आहे. 


संबंधित बातम्या :