कोलंबो : श्रीलंकेत रविवारी घडलेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी अखेर आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचे बळी गेले, तर पाचशेपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

श्रीलंकेतील नॅशनल तौविथ जमात या स्थानिक कट्टरपंथी संघटनेला या नरसंहारासाठी जबाबदार मानलं जात होतं. मात्र आयसिसने टेलिग्राम अॅपवरील चॅनलवर पोस्ट करत थेट जबाबदारी घेतली आहे. तसेच आयसिसस समर्थकांशी संबंधित असल्याचं मानल्या जाणाऱ्या 'अल घुबारा' मीडियानेही एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली

या व्हीडिओ संदेशात हा रक्तरंजित हल्ला तुम्हाला 'पुरस्कार' असल्याची घृणास्पद टिपणी करण्यात आली आहे. अब्दुल बारा, अब्दुल मुख्तार, अबु उबैदा या तिघांचे आयसिसच्या काळ्या झेंड्यासोबत त्यांच्या शैलीतील एक बोटाचा सॅल्यूट करणारी छायाचित्रेही पोस्ट करण्यात आली आहेत.



दरम्यान, श्रीलंकेचे अंतर्गत सुरक्षा राज्यमंत्री रुवान विजेवर्धिने यांनी न्यूझीलंडमधील ख्रिसचर्चमध्ये मशिदींमधील मुसलमानांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सूड उगवण्यासाठीच ईस्टर संडे हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:
श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट, राष्ट्रपतींकडून आणीबाणी जाहीर

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी