कानपूरसारखीच दुर्घटना रक्सौल-दरभंगा रेल्वे मार्गावर घडवल्याचा संशय या तिघांवर आहे. कानपूर अपघातातही त्यांचा हात असल्याचं शक्यता आहे.
पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू
इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेमागे एक रॅकेट कार्यरत असून त्याचा म्होरक्या दुबईत आहे, जो भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळमधील भाड्याच्या गुंडांचा वापर करत आहे. शमसुल होदा असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.
'डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे'
संशयितांना अटकेनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश एटीएस बिहारसाठी रवाना झाली आहे. त्यांच्याकडून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.