Indigo Airlines  पाकिस्तानमधील कराचीत इंडिगो विमानाला एमर्जन्सी लँडिंग (Indigo Airlines Emergency Landing) करावी लागली. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीत एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. 


इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले.  या विमानातील प्रवाशांना हैदराबाद येथे जाण्यासाठी एका अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


 






दरम्यान, याआधी 14 जुलै रोजी देखील जयपूरमध्ये  इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. 


पाच जुलै रोजी स्पाइसजेट विमानाची कराचीत एमर्जन्सी लँडिंग


पाच जुलै रोजीदेखील स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला पाकिस्तानमधील कराचीत लँडिंग करावी लागली.
स्पाइसजेटच्या बोईंग 737 MAX विमानात (SpiceJet's Boeing 737 MAX Aircraft) 5 जुलै रोजी सकाळी इंधन इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यानंतर कराची विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग (Unscheduled Landing) करण्यात आले होते. विमानात बिघाड झाल्याचे संकेत मिळताच वैमानिकांनी एमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानतळावर तपासणी केल्यानंतर विमानात कोणताही बिघाड झाला नसल्याचे समोर आले होते. या विमानात आधी कोणताही बिघाड झाला नाही.