व्हॅनकुव्हर: भारताच्या मान कौर या 100 वर्षाच्या महिलेने साता समुद्रापार अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. मान यांनी अमेरिकन मास्टर्स गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.

 

व्हॅनकुव्हरमध्ये झालेल्या या स्पर्धेत मान कौर यांनी 100 मीटर डॅशची शर्यत एक मिनिट आणि 21 सेकंदात पूर्ण केली. अमेरिकन मास्टर्स गेम्स ही स्पर्धा दर चार वर्षांनी खेळवली जाते. या स्पर्धेत वयाचे तिशी ओलांडलेलेच खेळाडू भाग घेतात.

 
विशेष म्हणजे मान कौर या एकमेव महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मान कौर धावत असताना उपस्थित प्रेक्षकांसह इतर खेळाडूही त्यांना चिअर करताना दिसले.