दुबईः दुबईत एका भारतीय उद्योजकाने गाडीला आवडता नंबर घेण्यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांची बोली लावली. बलविंदर साहनी असं या उद्योजकाचं नाव आहे. 'डी 5' हा नंबर मिळवण्यासाठी रोड अँड ट्रान्सपोर्टच्या निलामीत ही बोली लावली.
साहनी यांना अबू सबाह या नावानेही ओळखलं जातं. साहनी हे एका प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीचे मालक आहेत. साहनींच्या कंपनीचा यूएई, कुवैत, भारत आणि अमेरिका या देशांमध्ये विस्तार आहे. आवडता नंबर खरेदी करण्याची आवड असल्यामुळे ही बोली लावली, असं साहनी यांनी सांगितलं.
मागच्या वर्षीही साहनींनी 9 नंबर घेण्यासाठी 25 मिलियन दिरहम एवढी बोली लावली होती. आपल्याकडे आतापर्यंत अशा 10 यूनिक नंबर प्लेट जमल्या आहेत. यापैकी एखादी रॉल्स रॉयल कारसाठी वापरणार असल्याचं साहनींनी सांगितलं.