Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामध्ये 21,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे. भारतीय NDRF ची तीन पथकं तुर्कीमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. भारतीय जवान युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवत आहेत. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य करत असलेल्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याच्या गालावर चुंबन घेतानाचा तुर्की महिलेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
भारताचं 'ऑपरेशन दोस्त'
भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पाहा व्हायरल फोटो : तुर्की महिलेने मदत कार्यातील भारतीय महिला अधिकाऱ्याला केलं किस
भूकंपातील मृतांचा आकडा 21,000 पार
तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) गेल्या काही दशकातील मोठा विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे, इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय NDRF मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे.
भारताचं 'ऑपरेशन दोस्त'
भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
तुर्की-सीरियात विनाशकारी भूकंप
तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती. यानंतर एका मागोमाग एक अनेक धक्के बसले. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. भारताने बचाव पथकासह मदतीचं सामान तुर्कीमध्ये पाठवलं आहे. NDRF पथकासह जीवनावश्यक साहित्य, वैद्यकीय साहित्य आणि डॉक्टरांची टीम तुर्कीमध्ये बचावकार्यात गुंतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या