India Raises Concerns Over Khalistan : कॅनडातील खलिस्तान (Khalistan) समर्थकांकडून भारताविरोधात होणाऱ्या कारवायांवरुन भारत सरकारने कॅनडाच्या सरकारसमोर विरोध नोंदवलेला आहे. मात्र खलिस्तान समर्थक आणि खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, कॅनडामधील सरकारवर खलिस्तान समर्थकांचं लांगुलचालन करण्याचे आरोप सातत्याने होत असतात. बुधवारी भारत सरकारने खलिस्तानची मागणी करणाऱ्या तथाकथित योजना तयार करणाऱ्या काही संस्थेबाबत कॅनडा सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. कॅनडात भारतीयांविरोधात कारवाई करणाऱ्या आणि तेथील भारतीयांना त्रास देणाऱ्यांविरोधात भारत सरकारनं कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. 


भारत सरकारने कॅनाडा सरकारकडे विनंती केली आहे की, कायद्यानुसार  त्या व्यक्ती आणि संस्थांना दहशतवादी घोषित करा ज्यांना भारतीय कायद्यानुसार दहशतावदी संस्था म्हणून घोषित केलं आहे. कॅनडातील तथाकथित खलिस्तान सार्वमताच्या मुद्द्याबाबत बोलताना विदेश मंत्रायलायचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडा सरकारला सूचना केल्या आहेत. ते म्हणाले की, खलिस्तानबद्दल आम्ही अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे. भारतविरोधी घटकांकडून तथाकथित खलिस्तान सार्वमताच्या प्रयत्नांबाबत आमची भूमिका सर्वांनाच माहित आहे. याबाबत भारत सरकार आणि कॅनडा  सरकारला कळवण्यात आले आहे.
 
कॅनाडा सरकारला सूचित करताना बागची म्हणाले की, भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा तुमच्याकडून नेहमीच आदर केला जातोय. त्यामुळे कॅनडातील तथाकथित द्वि-चरण सार्वमताला तुम्ही मान्यता देणार नाहीत. कॅनडाचे उच्चायुक्त आणि त्यांच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला याचा पुनरुच्चार केला.


दरम्यान, दरम्यान, कॅनडामध्ये दिवाळी झालेल्या एका कार्यक्रमात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय समुदायातील लोकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. मिसिसॉग येथे खलिस्तानी समर्थक भारतीय समुदायाच्या लोकांना भिडले. त्यातून वादावादी झाली होती. भारतीय समुदायाच्या लोकांना मारहाण केली होती. खलिस्तान समर्थक आणि भारतीय समुदायातील लोकांमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र?  
 महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी  सुरू केला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली आहे. खलिस्तानवादी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार असल्याची माहिती आहे.


हे ही वाचायला विसरु नका : 


Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत अभ्यास मंडळात सुटा, तर 'पदव्युत्तर'मध्ये सुप्टाची सरशी