Explosion and Fire In Family Dairy Farm in West Texas : अमेरिकेतील (America) पश्चिम टेक्सासमधील फॅमिली डेअरी फार्ममध्ये स्फोट आणि आग लागून 18 हजारहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. आजवरच्या अमेरिकेन इतिहासातील हा सर्वांत मोठा रक्तपात आहे. कॅस्ट्रो कौंट्री शेरिफच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाने सोमवारी डिमिटजवळील साउथ फोर्क डेअरीमधील एका कर्मचाऱ्याची सुटका केली आहे.  


जेव्हा पोलिस आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक व्यक्ती अडकलेला दिसून आला. त्याला वाचवण्यात यश आलं असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्या आलं आहे. आग आणि धुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या गायींचा नेमका आकडा अज्ञात असताना, शेरीफ कार्यालयाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार 18 हजारांवर गायींचा मृत्यू झाला आहे. 






डेअरी फार्ममध्ये आग नेमकी कशाने लागली? याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमेरिकेतील सर्वांत मोठ्या दूध उत्पादकांपैकी एक असलेल्या फार्ममधील भीषण दुर्घटनेनंतर मालकी असलेल्या कुटुंबाशी अजून संपर्क झाला नसल्याचे राॅयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कायदे करावेत यासाठी अमेरिकेच्या अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूटने (AWI) दखल घेतली आहे.     


अमेरिकेतील काही राज्यांमध्ये प्राण्यांना आगीपासून संरक्षण देणारे कोणतेही फेडरल नियम नाहीत. टेक्सासचा मात्र, त्यामध्ये समावेश आहे. पशुधन असलेल्या अशा इमारतींसाठी अग्निसुरक्षा कोड स्वीकारला असल्याचे AWI ने निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेत गेल्या दशकभरात अशा प्रकारच्या भीषण आगीमध्ये सुमारे 65 लाखांवर पशुधनाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक कोंबड्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या