Pakistan : भारताचा (india) शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये मार्चमध्ये 33 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या 33 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) हे त्यांच्या पक्षाचे एकमेव उमेदवार असणारा आहेत. याबाबत त्यांच्या पक्षानेच घोषणा केली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी संध्याकाळी लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कुरेशी म्हणाले की, 'सर्व 33 लोकसभा जागांवर इम्रान खान (Imran Khan) हे पीटीआयचे एकमेव उमेदवार असतील. खान यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जमान पार्क लाहोर येथे झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानच्या (Pakistan) निवडणूक आयोगाने (ECP) शुक्रवारी जाहीर केले की, लोकसभेच्या 33 जागांसाठी 16 मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अविश्वास प्रस्तावानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या खान यांच्या पक्षातील खासदारांनी पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेचे (नॅशनल असेंब्ली) कनिष्ठ सभागृह सोडले. असं असलं तरी सभागृहाचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांनी खासदारांचे राजीनामे स्वीकारले नाहीत आणि ते म्हणाले की, खासदार त्यांच्या स्वेच्छेने राजीनामा देत आहेत की दबावाखाली आहेत, याची त्यांना वैयक्तिकरित्या पडताळणी करणे आवश्यक आहे.
सभापतींनी खासदारांचे राजीनामे स्वीकारले
गेल्या महिन्यात स्पीकरने 35 पीटीआय खासदारांचे राजीनामे स्वीकारले होते. त्यानंतर ईसीपीने त्यांना डी-नोटिफाइड केले. त्यानंतर स्पीकरने आणखी 35 खासदारांचे राजीनामे स्वीकारले आणि उर्वरित 43 पीटीआय खासदारांच्या राजीनाम्यानंतर, खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना नॅशनल असेंब्लीमध्ये येत पुन्हा विश्वात मत घेण्यात यावे असं आव्हान केलं.
इमरान खान यांनी आठपैकी सहा जागा जिंकल्या
ईसीपीने आतापर्यंत पीटीआयच्या 43 खासदारांना डी-नोटिफाइड केले आहे. जर ईसीपीने उर्वरित 43 पीटीआय खासदारांना डी-नोटिफाइड केलं, तर खान यांचा पक्ष राष्ट्रीय असेंब्लीमधून हद्दपार होईल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अध्यक्षांनी पीटीआयच्या 11 खासदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर खान (Imran Khan) यांनी आठ संसदीय जागा लढवल्या आणि सहा जिंकल्या.
इतर महत्वाची बातमी:
Pakistan Blast: नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी