इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर स्वपक्षातील महिला खासदाराने गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप महिला खासदार आएशा गुलालई यांनी केला आहे. त्यानंतर गुलालई यांनी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला.
आएशा गुलालई यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ट्वीट केला की, “बाय बाय पीटीआय.”
https://twitter.com/GulalaiWazir/status/892433974345248768
पीटीआय पक्षाशी जोडल्या गेलेल्या महिलांच्या सन्मानाला धोका असल्याचेही गुलालई यांनी म्हटले आहे. शिवाय, यावेळी त्या म्हणाल्या, “माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळी सन्मानाची गोष्ट येते, त्यावेळी मी कुठलीही तडजोड करु शकत नाही.”
“ब्लॅकबेरी मोबाईलवरुन ऑक्टोबर 2013 मध्ये इम्रान खान यांनी मला आक्षेपार्ह मेसेज केला. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने इम्रान खान यंचा ब्लॅकबेरी मोबाईल जप्त केला असल्यास, तो तपासून पाहावा.”, असे गुलालई यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी याबाबत बोलताना म्हटले, “आएशा गुलालई यांच्या आरोपांना गांभिर्याने घेऊन चौकशी करावी. महिलांच्या सन्मानाबाबत पाकिस्तान पिपल्स पार्टी कधीच तडजोड स्वीकारणार नाही.”
इम्रान खान यांच्यावर महिला खासदाराचे गंभीर आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 11:53 AM (IST)
पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर स्वपक्षातील महिला खासदाराने गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप महिला खासदार आएशा गुलालई यांनी केला आहे. त्यानंतर गुलालई यांनी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -