Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या मोठ्या राजकीय संकटात आहेत. विरोधकांसोबतच पक्षातील काही नेतेही त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्चीही संकटात आली आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय हलचालींना वेग आला असतानाच इम्रान खान यांनी भारताबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. भारताचं समर्थन करणारा शक्तीशाली देश पाकिस्तानवर नाराज असल्याचं वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे. 

Continues below advertisement

रशिया युक्रेन यांच्यातील युध्दादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान  इम्रान खान यांनी अचानक रशिया दौरा केला होता. या दौऱ्यानंतर इम्रान खांना पाकिस्तानातून टीकेचा सामना करावा लागला. शुक्रवारी इस्लामाबाद येथील सुरक्षा चर्चेत बोलताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, स्वतंत्र परराष्ट्र नितीसाठी रशिया दौरा महत्वाचा होता. इतर शक्तीशाली देशांवर निर्भर राहिल्यामुले पाकिस्तान आपल्या शिखर संभाव्यतेला स्पर्श करू शकलो नाही.

 स्वतंत्र परराष्ट्र धोरणाशिवाय कोणताही देश आपल्या लोकांचे हित सुरक्षित करू शकत नाही. परकीय मदतीच्या बदल्यात इतर देशांच्या इच्छेला बळी न पडता राष्ट्राचे हित उच्च ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. संबोधनाच्या मध्यभागी अमेरिकेचे नाव घेत इम्रान खान यांनी अमेरिकेतून धमकीचे पत्र आल्याचा दावा केला. ते पत्र माझ्या विरोधात होते, पत्रात अविश्वास प्रस्तावाबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. इम्रान खान पंतप्रधान राहिले तर तुमचे इतर देशासोबतचे संबंध बिघडतील, असे या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारताला अमेरिका समर्थन करत आहे, असे इम्रान खान म्हणाले. संबोधन करताना इम्रान खान यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी इम्रान खान रशिया दौऱ्यावर गेले होते. यावेळी इम्रान खान यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची भेट घेतली होती. त्यावेळी युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धाची ठिणगी पडली होती. 

Continues below advertisement

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live