लाहोर: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येच्या आरोपाखाली तिच्या लहान भावाला अटक करण्यात आली आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्यानं भावानं कंदीलची हत्या केली असल्याचं समजतं आहे.

 

कंदीलचा छोटा भाऊ वसीमला काल रात्री डेरा गाजी खान इथून अटक करण्यात आली. त्यानंतर वसीमने मान्य केलं की, बहिणीला विषारी अंमली द्रव्य देऊन नंतर तिची गळा आवळून हत्या केली. 'द डॉन'च्या वृत्तानुसार, वसीम म्हणतो की, 'कंदीलची हत्या केली कारण की, सोशल मीडियावर आपत्तीजनक व्हिडिओ आणि वक्तव्य प्रसिद्ध करुन तिनं बलौच कुटुंबाचं नाव धुळीला मिळावलं होतं.

 

कोहली, आफ्रिदी ते मोदी, कंदील बलोचची बेधडक वक्तव्य


मागील महिन्यात कंदीलनं मौलवी मुफ्ती अब्दुल कावी सोबत सेल्फी घेतला होता. त्यावरुन पाकमध्ये बराच वाद निर्माण झाला होता. यानंतर रएत-ए-हिलालने मुफ्ती कावीचं निलंबन केलं होतं.

 



कंदीलच्या वडिलांनी दावा केला होता की, तिचा छोटा भाऊ वसीमनंच तिची केली आहे. कंदिलच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदिल ईदच्या सुट्टीसाठी कराचीहून मुलतानला आली होती. 14 जुलैला वसीमही तिला भेटण्यासाठी आला होता.

 

संबंधित बातमी – कंदिल बलुच विराट कोहलीच्या प्रेमात, ट्विटरवर जाहीर कबुली

 

पोलिसांच्या मते, 'कंदीलला तिच्या कुटुंबीयांकडून मॉडेलिंग सोडण्यासाठी धमकी देण्यात येत होती. तिचा भाऊ देखील तिला फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओवरुन वारंवार धमकी देत होता. 'डॉन'चा वृत्तानुसार, कंदीलनं पोलीस सुरक्षा हवी यासाठी अर्जही केला होता.

 

संबंधित बातमी- मोदीजी, आम्हाला घाबरुन राहा, पाक अभिनेत्रीच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

कंदीलचं खरं नाव फौजिया अजीम होतं. मॉडेलिंग सुरु केल्यानंतर तिनं आपलं नाव बदलून कंदिल बलौच असं ठेवलं. कंदील सोशल मीडियावर अनेक उत्तेजक सेल्फीमुळे वारंवार चर्चेत येत होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहतेही होते.

 

संबंधित बातम्या

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाकडून हत्या


पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोंडसुख!



‘पाकिस्तानने भारताला हरवल्यास स्ट्रिप डान्स करेन’


मोदीजी, आम्हाला घाबरुन राहा, पाक अभिनेत्रीच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

कंदिल बलुच विराट कोहलीच्या प्रेमात, ट्विटरवर जाहीर कबुली