डॅन नावाच्या या वैमानिकानं चक्क सिडनीतल्या एका मॅकडोनल्ड आऊटलेटशेजारी हेलिकॉप्टर उतरवलं आणि आपलं पार्सल घेऊन निघाला. त्याच्या या कृत्यानं सगळेच अचंबित झाले. त्याचं हे कृत्य बेकायदेशीर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
या प्रकरणी ऑस्ट्रेलियन नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनांही प्रश्न विचारण्यात आले. मात्र जमीन मालकाच्या परवानगीनंतरच हे हेलिकॉप्टर लँड करण्यात आलं असल्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर नसल्याचं हवाई उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं.
पाहा व्हिडिओ :