मुंबई : मानवाची नेहमीच इच्छा राहिली आहे की त्याने जास्तीत जास्त वर्ष जगावं. त्यासाठी अनेक गोष्टींचं मानवाकडून संशोधन झालं आहे. या दरम्यान हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेविड सिंसलर यांनी दावा केला की मानव हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. आणि विशेष म्हणजे येत्या दोन वर्षात हे शक्य होणार आहे. प्रोफेसर डेविड सिंसलर यांनी हा दावा केला आहे. उंदरावर केलेल्या चाचणीत समोर आलं आहे की, मेंदू आणि अन्य अवयवांना वृद्ध झाल्यानंतर उलट फिरवले जाऊ शकते. याचाच अर्थ मानवाला एकप्रकारे अमर केले जाऊ शकते.  


प्रोफेसर डेविड सिंसलर यांनी म्हटले की, आम्हाला आढळले आहे की गर्भ म्हणजे एक जीन आहे. जी प्रौढ प्राण्यांमध्ये घातली जाऊ शकते जेणेकरुन वयाशी संबधित उतीं पुन्हा निर्माण केल्या जाऊ शकतात. चांगल्या रितीने काम करण्यासाठी याला 4 ते 8 आठवडे लागतात. एक नेत्रहीन उंदीर घेऊन जो की म्हातारपणामुळे आंधळा झाला आहे. त्यानंतर  मेंदूच्या बाजूला असलेला न्यूरॉन पुन्हा तयार केले तर हा उंदीर तरुण होईल आणि त्याची दृष्टी देखील पुन्हा येईल. 


हार्वर्डचे प्रोफेसर डेव्हिड सिंसलर म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की अशी एक यंत्रणा आहे ज्याद्वारे पेशींना युवावस्थेत नेलं जाऊ शकते. मला आशा आहे की जी चाचणी सध्या उंदरांवर सुरु आहे ती येत्या दोन वर्षात मानवावर केली जाईल. मानवी आयुष्यात वाढ होण्यासाठी आधुनिक औषधांचा काय परिणाम होतो या विषयी ते म्हणाले की आजच्या काळात जन्मलेल्या मुलांचे 100 वर्षे जगण्याचे उद्दीष्ट असले पाहिजे. मानवी आर्युमानाला कोणतील कमाल मर्यादा नसली पाहिजे., असं प्रोफेसर सिंसलर यांनी म्हटलं.