होय... ही ललना... दोन नातवांची आज्जी आहे. तुम्हालाचा काय... कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही.
नाव- झकलिना
वय- अवघे 47 वर्षे
मूळची- सर्बियाची
सध्या वास्तव्य- इटलीमध्ये
झकलीना ही पेशाने मॉडेल-बिडेल नाही. तर प्रोफेश्नल फॅशन ब्लॉगर आहे. पण लिहिण्यासोबत फॅशन कॉन्शियस असलेली झकलिना आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस असलेली झकलीना 'ग्रॅण्डमदरदॅटलव्हफॅशन' या नावाने ओळखली जाते. दोस्तहो... थोडेथोडके नाहीत... या आजीबाईंचे 1 लाख 58 हजार फॉलोअर्स आहेत.
रोममधल्या ऐतिहासिक स्थळांवर फोटो काढून ते इन्स्टावर अपलोड करणं हे झकलिनाला आवडतं. प्रख्यात ब्रॅन्डचे कपडे परिधान करुन सेल्फीज काढणे, हा तर झकलिनाचा छंदच.
झकलिनाला दोन मुले... त्यातल्या मोठ्या मुलीला दोन मुली झाल्या, तेव्हा ती अवघ्या 44 वर्षांची होती. आपल्या फॅशन सेन्सच्या बळावर ती सध्या सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे.
आतापर्यंत या आज्जीबाईंनी आपले चार मुक्काम बदलले आहेत. सर्बियातून स्वित्झर्लंड, स्वित्झर्ल्डंमधून फ्रान्स, फ्रान्समधून पोलंड आणि आता पोलंडमधून ती इटलीत स्थिरावली आहे.
खरंतर आज्जी हा शब्द उच्चारला, की सुरकुतलेला चेहरा, पिकलेले केस आणि दात पडल्याने तोंडाची झालेली बोळकांडी, असं लाघवी रुप आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या आज्जीचं रुप मात्र अनाकलनीय आहे.
एखाद्या मॉडेललाही लाजवेल अशी फिगर असलेली झकलिना कदाचित जगातली सर्वात ग्लॅमरस आज्जी असेल... नाही का?
पाहा व्हिडीओ