Hot Air Balloon Caught fire in Brazil: ब्राझीलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राझीलमधील दक्षिणीकडेल राज्य सँटा कॅटेरिनामध्ये हॉट एअर बलूनला हवेत आग लागली. या दुर्घटनेत किमान 8 लोकांचा मृत्यू झाला. इतर 13 लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी (21 जून 2025) घडली. हॉट एअर बलूनमधूनल 21 लोकांचा गट ऊंचावरुन त्या भागाची पाहणी करत होता. मात्र, हॉट एअर बलूनमधील प्रवास काही जणांसाठी अखेरचा ठरला. तर, काही जण जखमी झाली आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत हॉट एअर बलूनला लागलेली आग स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून काही लोक खाली पडताना पाहायला मिळत आहेत.
राज्य अग्निशमन विभागाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर तो ब्राझीलच्या प्राइया ग्रेंडे शहरात क्रॅश झाला. सँटा कॅटेरिना मिलिट्रीच्या फायर ब्रिगेडच्या हवाल्यानं असोसिएट प्रेसनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून राइड क्रॅश झाल्यानंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात पाठवण्यात आलं. हॉट एअर बलूनच्या साहसी राइडसाठी ब्राझीलमधील प्राइया ग्रैंडे शहर प्रसिद्ध आहे.
ब्राझीलमधील प्राइया ग्रैंडे हे शहर हॉट एअर बलूनच्या साहसी राइडसाठी लोकप्रिय आहे. जून महिन्यातील सणांच्या काळात हा साहसी प्रकार नेहमी केला जातो. या दरम्यान सेंट जॉन सारख्या कॅथलिक संतांचा सन्मान केला जातो. लोक ऊंचावरुन तो भाग पाहण्यासाठी लोक दक्षिण ब्राझीलमधील प्राइया गैंडे शहरात येतात.
यापूर्वी अनेकदा घटना
हॉट एअर बलून दुर्घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहे. स्थानिक वृत्त संस्था जी 1 च्या रिपोर्टनुसार गेल्या रविवारी देखील हॉट एअर बलून साओ पाउलो राज्यात क्रॅश झाला होता. त्या दुर्घटनेत 27 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. याशिवाय 11 लोक गंभीर जखमी झाले होते.