अंकारा : तुर्कीमध्ये सध्या पुरानं थैमान घातलं आहे. या पुरामध्ये शेकडो गाड्यांसह घरांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

तुर्कीची राजधानी अकांरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अचानक आलेल्या पावसासोबत पुरानेही थैमान घातलं. या पुरामध्ये शेकडो गाड्या वाहुन जाताना या व्हिडीओत दिसत आहेत.

तुर्कीतील या पुरामध्ये आतापर्यंत अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहे. मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या प्रशासनाकडून मदतकार्य आणि गाळ काढण्याचं काम सुरु आहे.