Israel-Palestine War : गाझा पट्टीतून इस्रायलच्या तीन शहरांवर हल्ला करण्यात आला आहे. पॅलेस्टानी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अल्जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलसह अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. हे रॉकेट निवासी भागात पडल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमधील संघर्ष फार जुना आहे. मात्र, आज 7 सप्टेंबर रोजी गाझा पट्टीतून पॅलेस्टानी संघटना हमासने पुन्हा एकदा इस्राइलवर हल्ला करत या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे.


गाझा पट्टीतून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला


टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हा दहशतवादी हल्ला असून या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मात्र, पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचवेळी इस्रायलने यावर प्रतिक्रिया देत युद्धासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


तेल अवीव आणि अश्कोलोनवर क्षेपणास्त्र डागले


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक हमास अतिरेकी इस्रायलमध्ये घुसल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, इस्रायलमध्ये हमास संघटनेच्या अतिरेक्यांच्या घुसखोरी बाबात अद्याप कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गाझामधून इस्रायलवर रॉकेट डागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तेल अवीव आणि अश्कोलोन शहरांवर रॉकेट हलेला करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझामधून इस्रायलच्या अनेक निवासी भागांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 






'आम्ही युद्धासाठी तयार आहोत'


गाझा येथून रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलनेही निवेदन जारी केलं आहे. 'आम्ही युद्धासाठी तयार आहोत', असं इस्रायलनं म्हटलं आहे. या हल्ल्याबाबत इस्रायल संरक्षण दलाच्या वतीने एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आज दिवसाची सुरुवात सायरनने झाली आहे. कारण गाझामधून आमच्यावर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. पण आम्ही स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम आहोत.


मागील 15 वर्षांपासून संघर्ष


पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास (Hamas group), इस्लामिक जिहादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे 2021 मध्ये झाली.