26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत
हाफिज सईदला जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यानंतर सरकारने हाफिजच्या नजरकैदेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत, त्याची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. गुरुवारी त्याची नजरकैदेतून सुटका होऊ शकते.
नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश देताना बोर्डाने सांगितले की, "जर जमात-उद-दावा प्रमुख हाफिज सईदविरोधात कोणत्याहीप्रकरणात आरोपी नसेल, तर त्याची सुटका केली पाहिजे."
'हाफिज सईद दाऊदच्या मदतीनं भारताविरोधात जिहाद पुकारणार'
गेल्याच महिन्यात कोर्टाने त्याची नजरकैद 30 दिवसांनी वाढवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत याच आठवड्यात संपते. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीमध्ये त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले.
हाफिज सईदची नवी संघटना, पाककडून कारवाईचा केवळ फार्स?
31 जानेवारी 2017 पासून हाफिज सईद आणि त्याचे चार साथिदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी कासिफ हुसैनला पंजाब सरकारने दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत नजरकैदेत ठेवलं होतं.
हाफिजच्या चार साथिदारांची ऑक्टोबरमध्ये नजरकैदेतून मुक्त करण्यात आलं. पण हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
हाफिज सईद पाण्यामार्गे भारतात हल्ला करण्याच्या तयारीत
होय, बुरहान वानी माझ्या संपर्कात होता : हाफिज सईद
पाकिस्तानच्या शत्रूचं असं स्वागत का?: हाफिज सईद
‘हे’ आहेत ‘फॅण्टम’चे हाफिज सईद, ‘यांच्या’ भूमिकेमुळेच हाफिज सईदचा तिळपापड
हाफिज सईद दहशतवाद्यांच्या यादीत, पाकिस्तानच्या पंजाब सरकारची कारवाई