Guinness World Records: आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणता? असा प्रश्न विचारला तर अनेक जण 'सोमवार' असं उत्तर देतील. काही संस्था या त्यांच्या कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार सुट्टी देत असतात. तर अनेक कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी ही रविवारी असते. त्यामुळे शनिवारी किंवा रविवारी ऑफिसला सुट्टी असेल तर परत सोमवारी ऑफिसला जायचा अनेकांना कंटाळा येतो. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस, म्हणून त्या दिवशी मूड अगदी फ्रेश करुन ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असते. त्यामुळे ज्या लोकांना सोमवारी काम करण्याचा कंटाळा येतो, त्यांच्यासाठी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं (Guinness World Records) एक खास घोषणा केली आहे. 'सोमवार हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस' अशी अधिकृत घोषणा एक ट्वीट शेअर करुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं केली आहे. 


गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं ट्वीट


गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'आम्ही अधिकृतपणे सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवसाचा रेकॉर्ड देत आहोत.' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 






नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अनेक नेटकऱ्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या ट्वीटला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'तुम्हाला ही घोषणा करायला बराच वेळ लागला.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'या कारणामुळेच मी सोमवारी साप्ताहिक सुट्टी घेतो.' तर एका नेटकऱ्यानं चक्की यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'आपण त्याला चांगलं कसं करु शकतो? यावर कारवाई करा. हा वार रद्द करु शकतो का?'










वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Guinness World Records : जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेस, 65 वर्षे काम करून बनवला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'!