Google Doodle Spring Season 2021 : गुगल नेहमीच खास डूडलद्वारे वेगवेगळे संदेश, सणांचं सेलिब्रेशन तसेच मोठ्या लोकांप्रती आदरभाव प्रकट करत असते. भन्नाट डूडलद्वारे एखाद्या गोष्टीला गुगल जगासमोर आणते. आज देखील गुगलनं एक खास डूडल बनवलं आहे. आज 20 मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतू सुरु झाला आहे. वसंत ऋतू 21 जूनपर्यंत कायम असतो. हा काळ फुलांचा हंगाम म्हणूनही ओळखला जातो.  वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलने भन्नाट रंगीबेरंगी डूडल साकारलं आहे.


वसंत ऋतू् हा सर्वात चांगला ऋतू मानला जातो. उत्तर गोलार्धात  झाडं, फुलांना नवीन पालवी फुटण्याचा हा हंगाम असतो. याच वसंत ऋतूतील भावना गुगलच्या या डूडल द्वारे प्रकट होत आहेत. फुलं, मधमाशा आणि हेजहॉग यांनी हे डुडल साकारण्यात आले आहे. डुडलमध्ये हेजहॉग सुंदर रंगीबेरंगी फुलांनी नटलेला दिसत आहे.


20 मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतूला सुरु झाला आहे. आजच्या दिवसाला 'Spring Equinox' असेही म्हणतात. वसंत ऋतूतील आजचा पहिला दिवस असून सूर्य आज दक्षिणेकडून उत्तरेकडील गोलार्धकडे जात विषुववृत्त ओलांडतो. 


गुगल रोज काय डूडल देईल, कुण्या व्यक्तिला मानवंदना देईल याची उत्सुकता रोज लागून असते. प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस, पुण्यस्मरण, एखादा सण गुगलकडून सुंदर डूडल साकारुन सेलिब्रेट केला जातो. गुगल असे डूडल देताना त्याविषयी माहिती देखील देत असतं. नुकतंच गुगलने आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी एका खास डुडलद्वारे महिलांप्रती सन्मान केला होता.