पाकिस्तान : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) निधन झाले. CDS बिपिन रावत यांच्या निधनावर पाकिस्तानच्या (Pakistan) संयुक्त कर्मचारी समितीचे अध्यक्ष जनरल नदीम रझा आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा आणि बिपिन रावत हे एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही आफ्रिकेत एका आघाडीवर एकत्र तैनात होते.
CDS जनरल रावत आणि जनरल बाजवा दोघेही 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सहभागी झाले होते. एका रिपोर्टनुसार, जनरल रावत यांना शांतता अभियानांतर्गत कॉंगोच्या उत्तर कीव ब्रिगेडचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, तर जनरल बाजवा यांनी दक्षिण कीव ब्रिगेडचे नेतृत्व केले होते. या शांतता मोहिमेत अनेक देशांचे सैनिक सहभागी झाले होते.
पाकिस्तानच्या हवाई दलाच्या प्रमुखांनीही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जनरल बिपिन रावत चीन आणि पाकिस्तानच्या नापाक धोरणांवर उघडपणे टीका करायचे आणि त्यांना चोख प्रत्युत्तरही द्यायचे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत आणि इतरांचा मृत्यू अत्यंत दुःखद असल्याचे सांगून, पाकिस्तानच्या तिन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही जनरल रावत आणि इतरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
दरम्याल, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अपघातात जनरल रावत आणि इतरांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, 'बांगलादेशने एक अद्भुत मित्र गमावला आहे. भारतातील लोक आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती आमच्या संवेदना.'' अमेरिका, रशिया, इस्रायलसह जगातील अनेक देशांनीही भारतीय सीडीएसच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. CDS जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधील अन्य 11 जणांचा बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Bipin Rawat Helicopter Crash : 2015 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमधून सुखरुप बचावले होते बिपिन रावत; काय होती ती दुर्घटना?
- Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha