Thermometer: जर तुम्ही कधी विमानात प्रवास (Plane Travel) केला असेल तर तुम्हाला माहित असेल की प्रवासादरम्यान विमानात अनेक वस्तू घेऊन जाण्यास मनाई (Ban) आहे. नियमानुसार, तुम्ही विमानात कोणतीही टोकदार वस्तू किंवा तीक्ष्ण वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. यासोबतच इतरही अनेक गोष्टी तुम्ही विमानात प्रवास करताना नेऊ शकत नाही.परंतु आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते थर्मामीटर आहे. आता तुम्ही विचार कराल की विमानात थर्मामीटर (Thermometer) नेल्याने काय होईल? त्याचा वापर तर ताप मोजण्यासाठी केला जातो, त्यामुळे कोणाला काय धोका होऊ शकत नाही. तर मग जाणून घ्या फ्लाइटमध्ये थर्मामीटरवर बंदी का आहे.


विमानात थर्मामीटर नेण्यास बंदी


ज्यांनी थर्मामीटर वापरला आहे त्यांना हे माहित असेल की, थर्मामीटर हे एक काचेचे लहान साधन आहे ज्याद्वारे आपण ताप मोजतो. मात्र, विमान प्रवासात त्यावर बंदी घालण्यामागचं कारण म्हणजे त्यात असलेला पारा. वास्तविक, ताप आल्यावर तापमान मोजण्यासाठी त्यात पारा भरला जातो आणि त्याद्वारे तुम्हाला किती ताप आहे हे कळते. पण या पाऱ्यामुळेच विमान प्रवासात थर्मामीटरवर बंदी आहे.


किती धोकादायक असतो पारा?


वास्तविक, थर्मामीटरमध्ये असलेला पारा विमानासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. पारा हा एक धातू आहे जो द्रव स्वरूपात आढळतो आणि जर तो अ‍ॅल्युमिनियममध्ये मिसळला तर तो संपूर्ण अ‍ॅल्युमिनियम नष्ट करतो. विमानातील बहुतांश भाग या अ‍ॅल्युमिनियमचे बनलेले आहेत, त्यामुळे विमानात पारा या धातूवर बंदी घालण्यात आली आहे, कारण विमानात असलेल्या अ‍ॅल्युमिनियमवर पारा पडला तर प्रवाशांसह विमानाचे मोठे नुकसान होऊ शकते.


नकार देऊनही थर्मामीटर विमानात नेल्यास काय होईल?


नकार देऊनही जर तुम्ही विमानात थर्मामीटर सोबत नेले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. विमानात बसलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्या कारणाने तुम्हाला अटक केली जाऊ शकते आणि चौकशीनंतर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. यासोबतच तुमच्या हवाई प्रवासावरही कायमची बंदी घातली जाऊ शकते. म्हणूनच विमानात प्रवास करताना चुकूनही पारा सोबत घेऊ नका, पारा या धातूचा समावेश असलेला थर्मामीटर देखील विमान प्रवासादरम्यान नेऊ नका.


हेही वाचा:


Weather Forecast: राज्याचा पारा वाढला, अनेक जिल्ह्यात तापमान चाळीशी पार; मोखा चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI