नवी दिल्ली : एकीकडे भारतात कोरोना लस घेण्याची अनेकांची इच्छा आहे, मात्र लसींच्या तुटवड्यामुळे त्यांना यासाठी वाट पाहावी लागत आहेत. तर दुसरीकडे असाही एक देश आहे की तेथील नागरिकांना लस घेण्यासाठी अक्षरश: धमकी द्यावी लागत आहेत. फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी करोना लस न घेणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे. फिलीपाईन्समध्ये डेल्टा वेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. फिलीपाईन्स सरकार येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. 


कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना देखील अनेक नागरिक लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सोमवारी रात्री दुतेर्ते म्ह्टलं की, लोकांसमोर आता दोन पर्याय आहेत. एक तर लस घ्या नाहितर जेलमध्ये जा. तुम्हाला कोणता पर्याय निवडायचं, तुम्ही ठरवा. फिलीपाईन्समध्ये परिस्थिती खराब आहे आणि कोरोना प्रसार थांबवण्याच्या प्रयत्नांना तिप्पट करावे लागेल. मला चुकीचे समजू नका. देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे.  सर्वांना लक्षात घ्या मला सक्ती करण्याची वेळ येऊ देऊ नका. माझ्याकडे हे करण्याची ताकद आहे.


फिलीपाईन्समध्ये मार्च महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र अशी माहिती मिळत आहे की, लोकांचा या लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद आहे. 


याआधी, मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी फिलीपाईन्समध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना गोळी मारण्याचे आदेश रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिले होते.