G-20 Summit In Bali :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या (G-20 Summit) पार्श्वभूमीवर आठ देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डमच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या देशांसोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत द्विपक्षीय करारावर सहमती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


PM मोदींची 8 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक


तत्पूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी G20 नेत्यांसोबत इंडोनेशियातील बाली येथील मॅंग्रोव्ह जंगलाला भेट दिली. जिथे त्यांनी G20 मध्ये सहभागी नेत्यांसह वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजल्यापासून G20 शिखर परिषदेच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सत्रात सहभागी होणार आहेत. त्यानंतर इंडोनेशिया दुपारी 12:30 वाजता G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवेल. यानंतर पंतप्रधान मोदी सहभागी राष्ट्रांच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यानंतर पीएम मोदी 4.15 वाजता बालीहून दिल्लीला रवाना होतील.


ऋषी सुनक आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट


मंगळवारी पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियातील बाली येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती जोको विडोडो यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पीएम मोदींनी ट्विट करून बालीमध्ये झालेल्या स्वागताबद्दल भारतीय समुदायाचे आभार मानले आहेत. याशिवाय पीएम मोदींनी त्यांच्या बाली दौऱ्याच्या पहिल्या दिवशी G20 शिखर परिषदेत यूकेचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली



ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा 
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातही भेट झाली. या नेत्यांनी मंगळवारी इतर क्षेत्रांसह भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीच्या स्थितीचा आढावा घेतला. दुसऱ्या एका बैठकीत पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशीही चर्चा केली.


G20 चे अध्यक्षपद भारताला मिळणार
बाली शिखर परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवतील. 1 डिसेंबर 2022 पासून भारत अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारेल. 2023 मध्ये भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी G20 सदस्यांना वैयक्तिक निमंत्रण देतील.


इतर महत्वाच्या बातम्या


G20 Summit: ते आले, त्यांनी पाहिलं, अन्..., पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजवलं इंडोनेशियन पारंपरिक वाद्य; व्हिडीओ होतोय व्हायरल