नवी दिल्ली: जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी 20 देशांनी एकजूट दाखवत मिळून काम करण्याचा संकल्प केला आहे. G20 देशांच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी जागतिक आरोग्य संघटने (WHO) सारख्या संस्थांना मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सोबतच उपचारासाठी लागणारी सामुग्री, टेंस्टिंग किट्स, वॅक्सिंग आणि या संबंधित खरेदी आणि आयातीसंदर्भात देखील भूमिका ठरवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जी20 देशातील नेत्यांनी COVID19 च्या या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईसाठी हिस्सेदारी करण्यावर देखील सहमती दर्शवली.

Coronavirus | प्रभासकडून चार कोटींची मदत; कलाकार, राजकीय नेते, कर्मचारीही सरसावले


सौदी अरबचे पंतप्रधान शाह सलमान बिन अब्दुल अजीज-अल-सौद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. ही बैठक कोरोनाच्या महामारीमुळे पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह जी 20 देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे य बैठकीला जागतिक आरोग्य संघटना, जागतील खाद्य संघटना, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेसह अन्य काही आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 लाख कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री

सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तीन मिनिटांच्या भाषणार कोरोना व्हायरससंदर्भात मत व्यक्त करताना या जागतिक महामारीला आटोक्यात आणण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय संस्थांनी केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी नव्हे तर मानवी आरोग्य आणि विकासाला केंद्र मानून कार्यक्रम तयार करावा, असं मत मांडलं.

या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या आरोग्य सेवांसाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाला सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार करावी, असा आग्रह देखील केला. कोरोनाच्या या महामारीचा सर्वाधिक फटका जी 20 देशांनाच बसला असल्याचे सांगत मोदींनी यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित येऊन अधिक चांगले प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.