दुबई : जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी एक असलेल्या दुबईतील 'टॉर्च टॉवर'ला आग लागली होती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवण्यात यश आलं आहे. 79 मजली इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
इमारतीच्या एका बाजुला आगीच्या ज्वाळा लागल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास 67 व्या मजल्यावर ही आग
लागल्याची माहिती आहे. आग विझवून कूलिंग ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत पहाटेचे चार वाजले. शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर इमारतीतील अनेक रहिवाशांनी तातडीने पळ काढला, तर इतरांना अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढलं.
79 मजल्याची दुबईतील 'टॉर्च टॉवर' ही इमारत 1 हजार 105 फूट (337 मीटर) उंच आहे. दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.
इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. 2015 मध्ये आग लागली, त्यावेळी शेकडो रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं.
जगातील उंच रहिवाशी इमारतींपैकी 79 मजली 'द टॉर्च'ला आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2017 08:07 AM (IST)
79 मजल्याची दुबईतील 'टॉर्च टॉवर' ही इमारत 1 हजार 105 फूट (337 मीटर) उंच आहे. दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.
फोटो सौजन्य : रॉयटर्स
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -