हवाना/ क्यूबा : क्यूबाचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्त्रो यांचा मुलगा डायझ-बॅलर्ट यांनी गुरुवारी आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ते 68 वर्षांचे होते.


डायझ-बॅलर्ट यांना गेल्या काही महिन्यांपासून नैराश्येने ग्रासले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली.

फोटो सौजन्य : AFP

डायझ बॅलर्ट हे त्यांच्या वडिलांप्रमाणे दिसत असल्याने यांना ‘फिडेलीटो’ असंही म्हटलं जात होतं. नैराश्येने ग्रासल्यामुळे त्यांना काही काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची मुभा दिली.

पण त्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण गुरुवारी सकाळी  त्यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, डायझ हे उच्च विद्याविभूषित होते. तसेच त्यांची आपल्या वडिलांप्रमाणेच क्यूबाच्या टॉप वैज्ञानिकांमध्ये गणना होत असे. विशेष म्हणजे, ते क्यूबाच्या राष्ट्रीय परिषदेचे सल्लागार सदस्यदेखील होते.