नवी दिल्लीः पोकीमॉन गो या गेमने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र काही ठिकाणी पोकीमॉन गोला वादांचा सामनाही करावा लागत आहे. सौदी अरेबियामध्ये या गेमविरोधात फतवा काढण्यात आला असून असे प्रकार मुस्लीम धर्मात व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

 

सौदीतील एका धार्मिक संस्थेने याविरोधात फतवा काढला आहे. याच संस्थेने 2001 मध्येही असाच एक फतवा काढत ही गेम झुगारचा प्रकार असल्याचं सांगितलं होतं. पोकीमॉन गो ही जुन्याच गेमचं व्हर्जन असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

संस्थेने पोकीमॉन गो विरोधात अनेक तर्क वितर्क लावले आहेत. या गेममध्ये कार्ड जिंकण्यासाठी स्पर्धा चालते. खेळताना कोणाला कार्ड गमवायचे नसेल तर त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळे ही संस्थेने गेमला मुस्लीम विरोधी असल्याचं सांगितलं आहे.

 

 

पोकीमॉन गोने जगभरात सध्या धुमाकूळ घातला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशातील तरुणाईवर तर या गेमचं फीव्हर आहे. त्यामुळेच या गेमला आता वादांचाही सामना करावा लागत आहे.