VIDEO: चित्त्यासारखी झेप घेत वडिलांनी वाचवले चिमुकल्यांचे प्राण!
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 08:39 AM (IST)
जांबी (इंडोनेशिया): आपल्या दोन मुलांना अक्षरश: प्राण धोक्यात घालून वडिलांनी मृत्यूच्या सापळ्यातून वाचवल्याची घटना समोर आली आहे. याचीच अंगावर काटा आणणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. इंडोनेशियाच्या जांबी शहरातली ही घटना आहे. झुकी चेन एम नावाचा इसम आपली मोटर सायकल रिपेअर करत होता. तर त्याची दोन मुलं गॅरेज समोर फिरत होती. तेवढ्यात एक भरधाव कार मुलांच्या दिशेनं धावत आली. ती कार मुलांना चिरडणार एवढ्यात झुकी चेन वायुवेगानं पुढं सरसावला आणि त्यानं आपल्या दोन्ही मुलांना कवेत घेऊन बाजूला खेचलं. डोळ्याची पापणी लवण्यापेक्षाही कमी कालावधीत हा सगळा प्रकार घडला. VIDEO: