नवी दिल्लीः पाकिस्तानमधील इस्लामाबाद शहरावर एफ-16 हे लढाऊ विमान घिरट्या घालत आहे, असा दावा पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी केला आहे. इस्लामाबादमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास विमान घिरट्या घालत असल्याचा दावा मीर यांनी केला आहे.
इस्लामाबादमधील मोटार वे रस्त्यावर लढाऊ विमान लँड केले आहेत, अशी माहिती होती. त्यानंतर रात्री तसेच चार लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं. या विमानांमधून आवाज काढले जात होते, अशी माहिती हमीद मीर यांनी 'एबीपी न्यूज'शी बोलताना दिली आहे.
पाकिस्तान या विमानाच्या घिरट्यांमधून पाकिस्तानातील जनतेला युद्धाची कल्पना देण्याचा प्रयत्न करत असावा, असं हमीद मीर याचं म्हणणं आहे. कारण मोटार वे हा मार्ग लढाऊ विमान उतरवण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला असल्याचंही मीर यांनी सांगितलं.
लाहोरमध्ये सर्वसाधारण वातावरण असल्याची माहिती पत्रकार अशरफ जावेद यांनी दिली आहे. मात्र ज्या प्रकारे माहिती येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये नक्कीच संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या भारत काय पाऊल उचलतं, याकडे सर्वांच्या नजरा असल्याचं जावेद यांनी सांगितलं.